रामायण कार्यक्रम दूरदर्शन नंतर आता 'या' चॅनलवर प्रेक्षकांना पाहता येणार

रामायण सागर यांचा रामायण (Ramayana) हा कार्यक्रम सध्या लॉकडाउनच्या काळात दूरदर्शनवर प्रदर्शित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून त्याने वर्ल्ड रिकॉर्ड केला आहे. जेव्हापासून रामायण दूरदर्शनवर प्रदर्शित करण्यास सुरुवात झाली तेव्हापासूनच अधिक चर्चा रंगली होती. रामायण संपल्यानंतर आता उत्तर रामायण सुरु झाले आहे. 

याला सुद्धा प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद मिळाला. परंतु उत्तर रामायण सुद्धा लवकरच संपणार आहे. परंतु प्रेक्षकांना नाराज व्हायची काहीच गरज नाही आहे. कारण प्रेक्षकांना त्यांचा आवडा शो रामायण पुन्हा एकदा पाहता येणार आहे. पुन्हा एकदा रामायण शो टेलीकास्ट होणार आहे. पण दूरदर्शनवर नाही याचे टेलीकास्ट होणार आहे.
टेलीचक्कर यांच्या माहितीनुसार, रामायण स्टार प्लस चॅनलवर दाखवला जाणार आहे. तर येत्या 4 मे पासून रात्री 9.30 वाजता प्रेक्षकांना तो पाहता येणार आहे. दरम्यान, रामायण टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. राम-रावण युद्ध आणि राम अयोध्येत येणाऱ्या काळाचा टीआरपी सर्वाधिक आहे.



 उत्तर रामायणाबाबत बोलायचे झाल्यास, कार्यक्रमात सध्या अश्वमेघ यज्ञ दाखवले जात आहे. लव-कुश यांनी अश्वमेघ यज्ञच्या घोड्याला पकडले आहे. तर राजा राम यांनी युद्धाची घोषणा केली आहे. लव-कुश यांनी शत्रुघ्न यांना हरविले आहे. लव-कुश यांच्या विरोधात युद्ध करण्यासाठी लक्ष्मण सुद्धा गेले आहेत. लवकरच सीता पुन्हा एकदा रामासोबत दिसून येणार आहे. तर लव-कुश त्यांच्या पिताश्रींना भेटणार आहेत.  सध्या दूरदर्शनवर सकाळी आणि रात्री 9 वाजता रामायण मालिका दाखवली जाते. लॉकडाऊनच्या काळात लोकाग्रहास्तव रामायण आणि महाभारत या पौराणिक मलिकांसोबतच शक्तिमान, जंगलबुक यासारखी मजेशीर तर श्रीमान श्रीमती, सर्कस, चाणक्य यासारख्या मालिकादेखील पुन्हा प्रसरित केल्या जात आहेत.

Comments

Popular posts from this blog

కరోనాపై పోరాటం: రూ. 500 కోట్లు సాయం ప్రకటించిన రతన్ టాటా

തലശേരി-മാഹി പാലം: നിർമ്മാണ പ്രവർത്തനങ്ങളിൽ അപാകതയില്ല; ബീമുകൾ സ്ഥാപിക്കുമ്പോൾ ഉണ്ടായ അപകടമെന്ന് എ.എൻ ഷംസീർ

Rajasthan BSTC Admit Card 2020 : राजस्थान प्री डीएलएड के एडमिट कार्ड जारी, ये रहा Direct Link